BJP Candidates List : भारतीय जनता पक्षाने (BJP) शनिवारी (30 मार्च 2024) लोकसभा उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. यात दिनेश शिंह 'बब्बू' यांना पंजाबच्या गुरुदासपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. तर बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) घरी बसवलं आहे. अमृतसरमधून तरणजीत सिंह संधू, जालंधरमधून सुशील कुमार रिंकू, लुधियानामधून रवनीत सिंह बिट्टू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय फरीदकोटमधून हंसराज हंस (Hansraj Hans) यांना उतरवलं आहे. तसेच परनीत कौर पटियालामधून निवडणूक लढवणार आहेत.


भाजपने जालंधरमधून सुशील कुमार रिंकू यांना तिकीट दिले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आम आदमी पार्टी सोडून बीजेपीमध्ये प्रवेश केला होता. रवनीत सिंह बिट्टू यांना लुधियानामधून उमेदवारी देण्यात आली आहे. बिट्टूही काँग्रेसमध्येच होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीचे खासदार हंसराज हंस यांना भाजपने फरीदकोटमधून उमेदवारी दिली आहे. परनीत कौर यांना पटियालामधून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर यांना काँग्रेसने निलंबित केले होते.






पंजाबमध्ये भाजप पहिल्यांदाच एकट्याने लोकसभा निवडणूक लढणार


पंजाबमध्ये भाजप पहिल्यांदाच एकट्याने लोकसभा निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत भाजप केवळ अकाली दलासोबत निवडणूक लढवत आहे. यापूर्वी अकाली दल एनडीएचा भाग होता. परंतु अकाली दलाने सप्टेंबर 2020 मध्ये कृषी कायद्यांच्या निषेधार्थ (जे नंतर रद्द केले गेले) एनडीएपासून वेगळे झाले. अकाली आणि भाजप 1996 मध्ये एकत्र आले आणि तेव्हापासून ते एकत्र निवडणुका लढत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुका देखील भाजप आणि अकाली यांनी एकत्रितपणे लढल्या होत्या, जेव्हा दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.


सनी देओलबद्दल जाणून घ्या... (Who is Sunny Deol)


सनी देओल हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत लोकसभेचे सदस्यदेखील आहेत. सनीने आजवर अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. बेताब या सिनेमाच्या माध्यमातून सनीने 1983 मध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सनीचे बॉर्डर आणि गदर हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. गेल्या 25 वर्षांत सनीने वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. अॅक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 


संबंधित बातम्या


Piyush Goyal: भाजपच्या वॉशिंग मशीनविषयी प्रश्न विचारताच पियूष गोयलांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा