मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने दिग्दर्शक मनीष शर्मासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. परिणीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली होती.

 

परिणीतीचा पहिला सिनेमा 'लेडीज वर्सेस रिक्की बहल' मनीष शर्मानेच दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स'मध्येही तिने मनीषसोबत काम केलं होतं. कामाच्या निमित्ताने दोघे जवळ आले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

 

"मी आणि मनीष खूप चांगले मित्र आहोत. आमच्याबद्दल नेहमी अफवा पसरवल्या जातात. आम्ही बऱ्याचदा भेटतो. पण माझ्या प्रेमाबद्दल मी काही सांगू शकत नाही. हा माझा वैयक्तिक मुद्दा असून फक्त माझ्या जवळच्या मित्रांनाच त्याबद्दल माहिती आहे." असं परिणीतीने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं.

 

ज्यादिवशी माझ्या आयुष्यात कुणी खास येईल त्यादिवशी स्वत:हून सगळ्यांना सांगेन, असंही ती पुढे म्हणाली.