‘कराची, यू आर किलिंग मी’ कादंबरी कराचीत राहणारी 20 वर्षीय पत्रकार आयशा खानची कथा आहे. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 7 एप्रिल 2017 रोजी ‘नूर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नूर’चा टीझर लॉन्च झाला आहे.
सनी लिऑन ‘नूर’ सिनेमात काम करणार असल्याच्या वृत्ताला निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी दिला. शिवाय, विक्रम मल्होत्रा म्हणाले, “सनी लिऑन नूर सिनेमात असेल आणि यातल्या काही सीन्समध्ये तिची महत्त्वाची भूमिका असेल. नूरमधील काही सीन्स फक्त तिच करु शकत होती. तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच.”