Raghav Chadha, Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. नुकतेच परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


परिणीती चोप्रा यांची पोस्ट


परिणीतीनं तिच्या आणि राघव यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'आम्ही एकदा नाश्ता एकत्र केला. त्यानंतर मला  माहित झाले की मी योग्य व्यक्तीला भेटले आहे. तो सर्वात अद्भुत माणूस ज्याचा स्वभाव शांत आणि प्रेरणादायक आहे. त्याचा पाठिंबा, विनोद बुद्धी आणि मैत्री ही निखळ आनंद देणारी आहे. तो माझ्या घरासारखा आहे. आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती. हे स्वप्न प्रेम, आनंद, भावना आणि डान्स या गोष्टींनी सुंदरपणे फुलणारे होते.'






राघव चढ्ढा यांची पोस्ट


राघव चढ्ढा यांनी काही फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ' एका चांगल्या दिवशी, या सुंदर मुलीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला.आमची एंगेजमेंट हा आनंदाचा प्रसंग होता. जिथे आनंदाचे अश्रू,   आनंद आणि नृत्याने आमचे प्रियजन आणखी जवळ आणले. अगदी पंजाबी पद्धतीने हा सोहळा पार पडला.'






पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. 


राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. आता परिणीती आणि राघव हे लग्न कधी करणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 


परिणीतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 


संबंधित बातम्या


Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यातील खास क्षण; शेअर केले फोटो