Anupam Kher Injured: अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलिवूडमधील टॅलेंडेट अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारुन अनुपम यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. लवकरच ते 'विजय 69' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सध्या ते या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. अनुपम यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून अनुपम यांनी त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे. 'विजय 69' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम यांना दुखापत झाली आहे. 


अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हाताला ब्लॅक कलरची  स्लिंग लावलेली दिसत आहे. या फोटोला अनुपम यांनी कॅप्शन दिलं, तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होणार नाही, असे कसे शक्य होईल? काल विजय 69 च्या शुटींग दरम्यान खांद्याला  दुखापत झाली होती. हे वेदनादायक आहे, पण खांद्यावर  sling लावणाऱ्या  भावाने जेव्हा सांगितले की, त्याने शाहरुख आणि हृतिक यांच्या खांद्याला पण हे   sling  लावले होते, तेव्हा  वेदना कमी झाल्या.पण  जर मला थोडा जोरात खोकला आला तर  नक्कीच वेदना होतात! फोटोत हसण्याचा प्रयत्न genuine आहे! एक-दोन दिवसांनी शूटींग पुन्हा सुरु करेल.. बाय द वे, हे जेव्हा आईला कळाले तेव्हा ती म्हणाली, अजून बॉडी जगाला दाखव, तुला नजर लागली आहे. यावर मी उत्तर दिले, आई! युद्धाच्या मैदानात फक्त योद्धेच पडतात.  मग आईनं मला थप्पड मारण्यापासून स्वत:ला थांबवलं.'






अशोक पंडित,गुरु रंधावा, निना गुप्ता आणि चंकी पांडे यांनी अनुपम खेर यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहे. अक्षय रॉय हे 'विजय 69'  या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अनुपम यांच्या 'विजय 69' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Anupam Kher Latest Video: अनुराग बासुने अनुपम खेर यांच्यासाठी बनवला 'अंडा डोसा'; व्हिडीओ व्हायरल