Parineeti Chopra On Dating Rumours: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते  राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी  हे राघव  चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे. का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता या सर्व चर्चांवर परिणीतीनं एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 


परिणीतीनं पुढे सांगितलं, 'मीडियाच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक जीवनाबाबत चर्चा केली जात आहे. कधी-कधी मार्यादा ओलांडून लोक पर्सनल गोष्टींबाबत चर्चा करतात. याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि आपमान करणं यामध्ये एक लहान रेष आहे. एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यावं लागत असेल तर मी देणार नाही.'  परिणीतीनं राघव चढ्ढा यांचे नाव घेतले नाही. पण परिणीती ही राघव यांच्याबद्दल बोलली, याचा अंदाज तिचे चाहते लावत आहेत.


संजीव अरोरा यांनी केलं होतं ट्वीट


आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार  संजीव अरोरा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.'  संजीव अरोरा यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले होते. डेटिंगच्या चर्चेबाबत काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.'






परिणीतीचे चित्रपट


इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Parineeti Chopra and Raghav Chadha : अफेअरच्या चर्चेदरम्यान आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबई विमानतळावर दिसले एकत्र; पाहा व्हिडीओ...