Parineeti Chopra and Raghav Chadha : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अनेक वेळा सेलिब्रिटींच्या डेटिंगबाबत सोशल मीडिया चर्चा होत असतात. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री   परिणीती चोप्रा  (Parineeti Chopra) आणि आदमी पार्टीचे खासदार   राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांच्या नात्याबाबत चर्चा  सोशल मीडियावर होत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला. आता पुन्हा परिणीती आणि राघव चड्ढा हे एकत्र दिसले आहेत. राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघे मुंबई विमानतळावर  (Mumbai  Airport) स्पॉट झाले.


मुंबई एअरपोर्टवरील (Mumbai Airport) परिणीती आणि राघव यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यावेळी परिणीतीनं काळ्या रंगाचा टी-शर्ट, काळे जॅकेट आणि निळी जीन्समध्ये, व्हाईट स्नीकर्स आणि चष्मा असा लूक केला होता. तसेच आम आदमी पक्षाचे खासदार राघव हे खाखी शर्ट आणि निळी जिन्स अशा लूकमध्ये दिसले. 


पाहा व्हिडीओ: 






आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार  संजीव अरोरा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.'  संजीव अरोरा यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले होते. डेटिंगच्या चर्चेबाबत काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.'


परिणीतीचे चित्रपट


इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोडले मौन; म्हणले, 'मला...'