Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: आम आदमी पक्षाचे   राघव चढ्ढा

    (Raghav Chadha) आणि अभिनेत्री    परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) शुक्रवारी (22 सप्टेंबर) सकाळी उदयपूरला (Udaipur) त्यांच्या लग्न समारंभासाठी पोहोचले. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्न सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये होणार आहे. नुकतेच परिणीती  आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


ब्लॅक कलरचा टीशर्ट, ब्लू जिन्स आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये राघव चढ्ढा हे उदयपूरच्या विमानतळावर स्पॉट झाले. त्यानंतर परिणीती ही रेड कलरचा आऊटफिट, मोकळे केस, डोळ्यावर गॉगल अशा कॅज्युअल लूकमध्ये उदयपूरच्या विमानतळावर आली. विमानतळावर दोघांचे स्वागत ढोल वाजवून करण्यात आले. 


पाहा व्हिडीओ:






परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी दिल्लीत एका सुफी नाइटचे देखील आयोजन केले होते. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे कार्यक्रम 23-24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहेत.


काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या  लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.ज्यावर मोठ्या अक्षरात, सोनारी रंगात, स्टायलिश अंदाजात परिणीती आणि राघव यांची नावे लिहिलेली दिसले.


'द लीला पॅलेस'मध्ये पार पडणार लग्न सोहळा


परिणीती आणि राघव यांचे लग्न राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं होणार आहे.  24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस सुरु असणार आहेत.  चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये  30 सप्टेंबर रोजी  परिणीती आणि राघव यांची रिसेप्शन पार्टी होणार आहे.


 राघव चड्ढा  आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे 2023 रोजी  पार पडला. त्यांच्या  साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या   साखरपुड्याला  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी हजेरी लावली. राघव चड्ढा  आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.


इतर महत्वाच्या बातम्या:


Parineeti Chopra and Raghav Chadha: उदयपूरमध्ये परिणीती, राघव यांचं शुभमंगल; थाटामाटात पार पडणार शाही विवाहसोहळा; कशी असेल वेडिंग थीम, रिसेप्शन अन् व्हेन्यू?