Parineeti Chopra and Raghav Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा (Raghav Chadha) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील  (Rajasthan) उदयपूर  (Udaipur)  येथे परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.


चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये   30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिणीती आणि राघव यांच्या रिसेप्शन पार्टीच्या आमंत्रण पत्रिकेच्या खास फोटोची झलक एबीपी न्यूजनं दाखवली आहे. आता या दोघांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो देखील समोर आला आहे. जाणून घ्या परिणीती आणि राघव  यांच्या लग्नाच्या संपूर्ण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती...


परिणीती आणि राघव यांचे लग्न राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं होणार आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेनुसार 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस सुरु असणार आहेत. 


लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता परिणीती चोप्राचा चुडा समारंभा होईल आणि संपूर्ण सोहळा महाराजा स्वीटमध्ये पार पडेल. 23 सप्टेंबर रोजी सर्व पाहुण्यांसाठी भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या लंच कार्यक्रमाला 'ग्रेन्स ऑफ लव्ह' असे नाव देण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व पाहुण्यांना विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. हा जेवणाचा कार्यक्रम दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये होईल.


23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाही भोजनाच्या कार्यक्रमानंतर, हॉटेलच्या बागेत  सर्व पाहुण्यांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या एक दिवस आधी होणारी ही पार्टी 90 च्या दशकाच्या थीमवर आधारित असेल. ही धमाल पार्टी संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल, ज्याला 'लेट्स पार्टी लाइक इट्स नाइन्टीज' असे नाव देण्यात आले आहे.




 
उदयपूरच्या ताज लीला पॅलेस हॉटेलमध्ये 24 सप्टेंबरला सकाळपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्नाचे विधी सुरू होतील. दुपारी 1.00 वाजता वर राघव चड्ढा यांच्या सेहराबंदीने लग्नाच्या विधींना सुरुवात होईल, त्यानंतर दुपारी 2.00 वाजता लग्नाच्या वरातीचे आयोजन केले जाईल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता परिणीती आणि राघवच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वरमाला कार्यक्रम होणार आहे.  




24 सप्टेंबर रोजी शाही पद्धतीने लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता नववधू परिणीती चोप्राच्या पाठवणीचा समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर, 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये रात्री 8.30 वाजल्यापासून लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले जाईल. मात्र, कार्डमध्ये मेहंदी, हळदी आणि संगीत विधींचा उल्लेख करण्यात आला नाही. रिपोर्टनुसार, लग्नाची थीम 'अ पर्ल व्हाइट इंडियन वेडिंग' अशी असेल.


संबंधित बातम्या:


Parineeti Chopra Raghav Chadha : राघव चड्ढापेक्षा परिणीती चोप्रा शंभरपटीने श्रीमंत; जाणून घ्या संपत्तीबद्दल...