Pankaj Tripathi On Mirzapur Web Series :  बहुप्रतिक्षीत मिर्झापूरच्या तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन 5 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजने कलाकारांना स्टारडम दिले. अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी देखील 'मिर्झापूर'बद्दल  कृतज्ञता व्यक्त केली.  या वेब सीरिजच्या आधी आम्ही फक्त कलाकार होतो. या सीरिजनंतर आम्ही स्टार झालो असल्याचे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले. 


मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी हे गँगस्टर कालीन भैय्याची भूमिका साकारत आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले, माझ्या कारकिर्दीत 'मिर्झापूर'चे स्थान महत्त्वाचे आहे. मुलाखती दरम्यान आम्हाला आता पत्रकार स्टार कास्ट असे म्हणतात. मात्र, 'मिर्झापूर' लोकप्रिय होण्याआधी आम्ही फक्त एखाद्या कार्यक्रमातील, शोमधील कास्ट (कलाकार) होतो. आम्हाला मिळालेल्या स्टारडमचे श्रेय हे 'मिर्झापूर'चे असल्याचे पंकज त्रिपाठी सांगतात. 


महिला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया... 


पंकज त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, मिर्झापूर या वेब सीरिजने आम्हाला स्टार बनवले. पहिल्या सीझननंतर विशेषत: महिला प्रेक्षक वर्गाकडून चांगल्या प्रतिक्रिया मला मिळाली. त्यावेळी असं लक्षात आले की कालीन भैय्या हा डॉन इतरांपेक्षा वेगळा आहे. 


कालीन भैय्या इतरांपेक्षा वेगळा डॉन कसा?


पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, पारंपारिक माफिया आणि डॉनपेक्षा वेगळे, प्रभावी आणि सभ्य बोलतात, नैतिक आणि विश्वासार्ह असल्याचे ढोंग करतात. कलेन भैया हा सामान्य गुन्हेगार नाही, यामुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. आपल्या माणसांचे अनेक पैलू आहेत आणि कालीन भैय्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.


या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीशिवाय अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैनयुली,  हर्षिता शेखर गौड, राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.