Anand Mahindra-Ram Charan Naatu Naatu moment : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हैदराबाद येथे ई-कार रेसिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावेळी अनेक सुपरस्टार, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. साऊथ सुपरस्टार राम चरणनेही (Ram Charan) फॉर्म्युला ई कार रेसिंगमध्ये भाग घेतला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. यावेळी सुपरस्टार राम चरणने उद्योगपती आनंद महिंद्रा यांना आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू या प्रसिद्ध गाण्याची हूकस्टेपही शिकवली. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. 


ई रेसिंग कार्यक्रमात दिग्गजांची हजेरी


या कार्यक्रमाच्या दरम्यान राम चरण आणि आनंद महिंद्रा यांचीही भेटही झाली. यावेळी आनंद महिंद्रा यांनी राम चरणला जगभरात प्रसिद्ध झालेल्या नाटू-नाटू गाण्याची हुकस्टेप शिकवण्यास सांगितली. आणि राम चरणने त्यांना नाटू-नाटूची हूकस्टेपही शिकवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आनंद महिंद्रा यांनी नाटू-नाटूची हुकस्टेप केली






आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच राम चरणला हूकस्टेप शिकवल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. याशिवाय आरआरआरच्या यशाबद्दल त्याचं आणि संपूर्ण टीमचं कौतुकही केलं आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्विटला राम चरणनेही रिप्लाय दिला आहे. राम चरण म्हणाला की,'आनंद महिंद्रा जी, तुम्ही माझ्यापेक्षाही कमी वेळात ही स्टेप शिकलात. ही भेट खूपच रंजक होती. शुभेच्छांसाठी RRR चित्रपटाच्या टीमकडून धन्यवाद.'


सचिन तेंडुलकरचीही उपस्थिती






राम चरणने हैदराबाद फॉर्म्युला ई रेसिंग इव्हेंटचा अनुभव देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच कार्यक्रमाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी राम चरण, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरही दिसला. राम चरणने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही एक उत्तम शर्यत होती. फॉर्म्युला ई मधील महिंद्रा रेसिंग खूपच थरारक होती. त्याचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भेटून खूप आनंद झाला. मला माझ्या देशाचा, माझ्या राज्याचा आणि माझ्या हैदराबाद शहराचा अभिमान आहे.'


महत्त्वाच्या बातम्या : 


Ram Charan : राम चरणने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा, छोट्या चाहत्यासोबतचे फोटो व्हायरल