मुंबई : सोमवारी (10 जून) रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. आज मंगळवारी या अकाऊंट हॅक करणाऱ्यांचा बदला घेण्यात आला आहे. या बदल्यात पाकिस्तानच्या 5 वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या ज्या वेबसाईटस हॅक करण्यात आल्यात त्यांच्या होमपेजवर अमिताभ बच्चन आणि भारतीय तिरंग्याचा फोटो दिसून येत आहे. तसेच वेबसाईटस ओपन होताच वंदे मातारम गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. त्यामुळं अमिताभ यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा सायबर स्ट्राईक असल्याचं बोललं जातं आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी (10 जून) रात्री हॅक करण्यात आलं होतं. हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. सोबतच बायोमध्ये 'लव्ह पाकिस्तान' असं लिहिलं होतं. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या हॅकर्सनी ही नसती उठाठेव केल्याचं कळतंय. मात्र पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक करून हिशेब चुकता केलायाचं बोललं जात आहे.



अमिताभ बच्चन ट्विटरवर फारच अॅक्टिव्ह असतात आणि इथे त्यांचे 3.74 कोटी फॉलोअर्स आहेत. दररोज ट्विटरद्वारे ते आपले विचार नेटिझन्ससोबत शेअर करतात. ट्व‍िटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन अमिताभ आपल्या चाहत्यांना त्यांच्या प्रत्येक घडमोडींची माहिती देत असतात.