मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'पद्मावती' चित्रपटासाठी कलाकारांची जुळवाजुळव सुरु आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं, तरी दीपिका तिच्या पतीच्या भूमिकेसाठी मोठ्या कलाकारासाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे.
रमन राघव 2.0 चित्रपटातील विकी कौशल या अभिनेत्याने पद्मावतीच्या पतीच्या म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिल्याची माहिती आहे. 2015 मध्ये आलेला मसान चित्रपट आणि रमन राघव 2.0 मधील भूमिकेने त्याने बॉलिवूडला दखल घ्यायला लावली आहे. सध्या त्याच्याशी बोलणी सुरु असून अद्याप काहीच निश्चित झालेलं नाही.
दीपिका पदुकोण या चित्रपटात मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, तर रणवीर सिंग तिचा प्रियकर सुलतान अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. गोलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
दीपिका मात्र आपल्या पतीच्या भूमिकेत एखादा मोठा स्टार असावा, यासाठी आग्रही असल्याचं वृत्त आहे. काही टीव्ही अभिनेत्यांशी राजाच्या भूमिकेसाठी चर्चा सुरु होती, मात्र दीपिकाने छोट्या कलाकारांना कास्ट करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. पिंकविलाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही. दीपिका पदुकोणच्या आगामी xXx : द रिटर्न ऑफ झँडर केजचा टीझर लाँच झाला आहे. हॉलिवूड पदार्पणासाठी दीपिका प्रचंड उत्सुक आहे. तर रणवीर सिंग आदित्य चोप्रांच्या बेफिक्रेमध्ये विकी कौशल, वाणी कपूरसोबत दिसणार आहे. तसंच आयुषमान खुराणा-भूमी पेडणेकर या जोडीच्या मनमर्झियामध्येही तो मुख्य भूमिकेत आहे.