नवी दिल्लीः हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणचं मानधन वाढणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच दीपिका तिच्या आगामी 'पद्मावती' सिनेमासाठी 11 कोटी रुपये एवढ मानधन घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा निराधार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या बिगबजेट 'पद्मावती' सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पुन्हा एकदा दिसणार आहेत. या सिनेमासाठी दीपिकाने हॉलिवूड सिनेमाप्रमाणेच जास्तीचं मानधन घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र भन्साळी यांच्या प्रवक्त्यांनी या केवळ अफवा असून त्यामध्ये कसलंही सत्य नसल्याचं सांगितलं.

 

दीपिका रणवीरने यापूर्वी भन्साळींसोबत गलियो की लीलाः रामलीला, बाजीराव मस्तानी या सुपरहीट सिनेमात काम केलं आहे. मात्र दीपिकाने हॉलिवूडच्या XXX या सिनेमात काम केल्यानंतर मानधन वाढवलं असल्याची चर्चा होती. यावर भन्साळींकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.