मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या प्रसिद्ध ‘डर’ सिनेमाची मिनी सीरीज लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. या मिनी सीरीजचं नाव ‘डर 2.0’ असून, पोस्टर आणि टीझर रिलीज झाले आहेत. शाहरुखचा ‘डर’ सिनेमा 1993 मध्ये प्रदर्शित रिलीज झाला होता.


 

टीझरची सुरुवात म्युझिकनेच करण्यात आली असून, यामध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा ट्रेण्ड दाखवण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीची काही मिनिटं झाल्यानंतर म्युझिक आणि टीझरही अत्यंत गंभीर वळणावर जातं आणि फेसबुकवरील तरुणींच्या फोटोवर कम्प्युटरचं माऊस फिरताना दिसतं.

 

यामध्ये एक तरुण फोटो शेअर करताना दाखवण्यात आला आहे आणि टीझरच्या शेवटी शाहरुख स्टाईलमध्ये एक तरुण स्क्रीनवर हात फिरवतो आणि म्हणतो, लव्ह यू कि...कि...किरण!

 

सायबर क्राईमवर आधारित हा सिनेमा असून, वाय फिल्मच्या बॅनरखाली बनवली जात आहे. पाच भागात ही मिनी सीरीज बनवली गेली आहे.