मुंबई : निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ सिनेमा उद्या (25 जानेवारी) संपूर्ण देशभर रिलीज होणार आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर या तिघांच्याही सिनेक्षेत्रातील करिअरमधील सर्वात वादग्रस्त सिनेमा ठरला आहे. मात्र याचसोबत शाहिदच्या करिअरसाठी ‘पद्मावत’ सिनेमा ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.


शाहिदचा सिनेक्षेत्रातील लोकप्रियतेचा आतापर्यंतचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र तरीही गेल्या काही काळात शाहिद कपूरच्या सिनेमांनी म्हणावी तितकी लोकप्रियता मिळवली नाही. त्यामुळे ‘पद्मावत’ सिनेमा शाहिदसाठी ‘गेम चेंजर’ म्हणून पाहिले जात आहे.

शाहिदने एकापेक्षा एक वेगवेगळ्या भूमिका केल्या. बहुतांश भूमिकांचं कौतुकही झाले. मात्र शानदार, उडता पंजाब आणि रंगून सारख्या सिनेमांना प्रेक्षकांनी फार पसंती दिली नाही. त्यामुळे ‘पद्मावत’ सिनेमा वेगळा ठरणार आहे, कारण या सिनेमातून पहिल्यांदाच एखाद्या रॉयल भूमिकेत शाहिद दिसणार आहे.

‘पद्मावत’ जर 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाली, तर शाहिदचा पहिला सिनेमा असेल, जो 100 कोटींच्या क्लबमध्ये जाईल. फिल्म ट्रेड अनॅलिस्टचे अंदाज आहेत की, ‘पद्मावत’ सिनेमा 300 कोटींचा टप्पा आरामात पार करेल.

शाहिद कपूरसाठी आगामी काळ कसा असेल, ते कळेलच. मात्र ‘पद्मावत’मधील भूमिकेवरुन त्याची पुढील वाटचाल आणखी ठळकपणे दिसून येईल, हेही निश्चित.