मुंबई : बॉलिवूड सिनेमातील एक महत्त्वाचं समीकरण मानली जाणारी जोडी दिग्दर्शक नीरज पांडे आणि अभिनेता अक्षय कुमार 26 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर आमनेसामने असतील. नीरज पांडे यांचा 'अय्यारी' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच दिवशी रिलीज होतोय.


नीरज पांडे यांच्या अय्यारी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मनोज वाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, अनुपम खेर आणि नसरुद्दीन शाह हे अभिनेते असतील. तर पॅडमॅन हा अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे, ज्यात अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे दिसतील.

अय्यारीचा ट्रेलर :



'अय्यारी' हा देशभक्तीवर आधारित सिनेमा आहे. तर अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सामाजिक विषयावरील. त्यामुळे दोन्ही सिनेमात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नीरज पांडे आणि अक्षय कुमार यांनी यापूर्वी स्पेशल 26, बेबी यांसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर एकत्र धुमाकूळ घातला आहे. मात्र आता दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतील.

प‌ॅडमॅनचा ट्रेलर :