जिग्नेश मेवाणी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवाराचा 21 हजार मतांनी पराभव केला. जिग्नेश मेवाणी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. कारण या मतदारसंघात काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नव्हता.
स्वरा भास्करने जिग्नेश मेवाणीला शुभेच्छा देताच ट्रोलर्सने तिच्यावर तोंडसुख घेतलं. तिच्यावर आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, तिने कुणाच्याही कमेंटला रिप्लाय दिला नाही.