मुंबई : दीपिका पदूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या 'पद्मावत' सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरुच आहे. सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 14 कोटी रुपयांची कमाई केली.


'पद्मावत'ने सोमवारी 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 143 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा केवळ भारतातील कमाईचा आहे. परदेशातही या सिनेमाने चांगली कमाई केली. भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये हा सिनेमा रिलीज झालेला नाही.

सिनेमाची आतापर्यंतची कमाई

  • पेड प्रीव्ह्यू, बुधवार – 5 कोटी रुपये

  • पहिला दिवस, गुरुवार – 19 कोटी रुपये

  • दुसरा दिवस, शुक्रवार – 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस, शनिवार – 27 कोटी रुपये

  • चौथा दिवस, रविवार – 30 कोटी रुपये

  • पाचवा दिवस, सोमवार – 15 कोटी रुपये

  • सहावा दिवस, मंगळवार – 14 कोटी रुपये


एकूण कमाई - 143 कोटी रुपये