Prashant Tamang : 'पाताल लोक 2' वेब सीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनप्रमाणे दुसरा सीझनही चांगलाच हिट ठरला. पाताला लोकचा पहिला सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. पाताल लोक सीझन 2 प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला. याची कहाणी, सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांच्या अभिनय सर्वांनाच प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. 'पाताल लोक 2' मधील खतरनाक स्निपर डेनियल लाचो आठवतोय का, या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात इंडियन आयडल शो जिंकला आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.


'पाताल लोक सीझन 2' हिट


2020 मध्ये सुपरहिट झालेल्या पाताल लोकच्या पहिल्या सीझननंतर, यावेळी दुसरा दमदार सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जयदिप अहलावतने (Jaideep Ahlawat) पुन्हा एकदा इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. यासोबत या सीरीजमध्ये अनेक नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. यामध्ये तिलोत्तमा शोम ही देखील मालिकेत एक नवीन कलाकार म्हणून दिसली आहे. यासोबत एका धोकादायक स्निपरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.  


18 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल


'पाताल लोक' वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या रिलीजपासून प्रशांत तमांगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्रशांत तमांगचे व्हिडीओ या वेब सीरीजमधील नसून जुने आहेत. प्रशांतचे हे व्हिडीओ सुमारे 18 वर्षे जुने आहेत. पाताल लोकच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्निपर डॅनियलची धोकादायक भूमिका साकारणारा प्रशांत तमांग 'इंडियन आयडल ३' चा विजेता होता.


कोण आहे 'पाताल लोक 2'मधील स्निपर?


प्रशांत तमांग अभिनेता असण्यासोबतच एक गायक आहे. प्रशांत तमांग यांचा जन्म 1983 मध्ये दार्जिलिंग येथे झाला. वडिलांचे अपघातात निधन झाल्यानंतर, त्याने शाळा सोडली आणि वडिलांच्या जागी कोलकाता पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. 2007 मध्ये त्याने इंडियन आयडल 3 शो जिंकला होता.


प्रशांत तमांगचा व्हायरल व्हिडीओ पाहा






18 वर्षे कुठे गायब होता प्रशांत तमांग?


प्रशांत तमांग याने त्यांच्या मधूर इंडियन आयडल-3 जिंकला आहे आणि आता तो 'पाताल लोक' वेब सीरिजमध्ये अभिनय करून अभिनयाची झलक दाखवली आहे. उत्तम अभिनय आणि दमदार संवाद कौशल्याच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. प्रशांत तमांगने 2007 मध्ये इंडियन आयडल जिंकला होता. त्यानंतर 18 वर्षांनी तो थेट मोठ्या पडद्यावर परताला आहे. त्याला पुन्हा प्रकाशझोतात येण्यासाठी 18 वर्षे लागली, हा का तो काय करत होता, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


"तो मी नव्हेच", सैफवर हल्ला करणारा खरा आरोपी भलताच? CCTV मध्ये दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार