OTT Web Series Thriller Web Series :  क्राईम, थ्रीलर वेब सीरिज 'मिर्झापूर-3'ची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे. मिर्झापूरच्या मागील दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.  मिर्झापूरमधील गु्न्हेगारी विश्वाला केंद्रस्थानी ठेवत या सीरिजची गोष्ट गुंफण्यात आली आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, ताकदीची पटकथा यामुळे प्रेक्षकांनी वेब सीरिजला चांगलाच प्रतिसाद दिला. अॅमेझॉन प्राईमवर या वेब सीरिजचे दोन्ही सीझन आहेत. 


स्कॅम 1992 


मुंबई शेअर बाजारात गाजलेल्या घोटाळ्यावर आधारीत ही वेब सीरिज आहे.  ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सीरिज हर्षदा मेहताने केलेल्या घोटाळ्यावर आधारीत ही वेब सीरिज आहे. 9 ऑक्टोबर 2020 रोजी सोनी लिव्हवर ही वेब सीरिज प्रसारीत झाली होती. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली गेलेली ही वेब सीरिज आहे. 


आर्या


सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेली ही 'आर्या' वेब सीरिज  डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सीरिजची कथा आर्या सरीनवर आधारीत आहे. आपल्या पतीची रहस्यमयरीत्या हत्या झाल्यानंतर आर्या मुलांची आणि त्याच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळते. मात्र, नवऱ्याच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवते.  या दरम्यान तिला आपल्या नवऱ्याची काळी बाजूदेखील समजते आणि ती एका चक्रव्यूहमध्ये अडकते. 


सेक्रेड गेम्स


सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकीची भूमिका असलेल्या सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. गँगस्टर असलेल्या गणेश गायतोंडे यात मुख्य सूत्रधार आहे. शहरावरील एका मोठ्या संकटाबाबत गायतोंडे पोलिसांना सांगतो. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 


असूर


'असूर' ची कथा एक फॉरेसिंक तज्ज्ञांच्या टीम भोवती फिरणाऱ्या घडामोडींवर आधारीत आहे. तपास यंत्रणांना  एका सीरियल किलरचा शोध घ्यायचा असतो. हा असूर स्वत:ला कालीचा अवतार मानतो. अर्शद वारसी,  अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा, अमेय वाघ आदींचा दमदार परफॉर्मेन्स या वेब सीरिजमध्ये पाहता येईल. 


रंगबाज


1990 च्या दशकावर आधारीत असलेली ही मालिका 'रंगबाज' गोरखपूरमधील 25 वर्षीय युवक शिव प्रकाश शुक्लाची गोष्ट आहे. तो उत्तर प्रदेशमध्ये गँगस्टर होतो. शिव हा प्रभावी राजकीय नेत्यांसोबत काम करतो आणि त्यांच्या वाईट कृत्यात साथ देतो.


ताजा खबर 


डिस्नी हॉटस्टारवर ही 'ताजा खबर' वेब सीरिज आहे. एक गरीब, सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात अचानक बदल घडतात. एका मोबाईलमुळे त्याच्या आयुष्याला  मोठी कलाटणी मिळते. तो श्रीमंतही होतो, पण त्यासोबतीला अनेक संकटाची मालिकाही सुरू होते.