Ravi Kishan : अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कथित मुलीने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर दिंडोशी सेशन कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. गुरुवार 25 एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवी किशन यांनी शिनोव्हाला मुलगी म्हणून स्वीकारण्यास देखील नकार दिला आहे. रवी किशन हे माझे वडिल असल्याचा दावा शिनोव्हाने केला आहे. पण ती त्यांना काका म्हणून हाक मारायची असा देखील उल्लेख यावेळी तिने केला. त्यानंतर शिनोव्हाने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.
आजतकच्या रिपोर्ट्सनुसार, सुनावणीदरम्यान शिनोवाचे वकील सुशील उपाध्याय यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात युक्तिवाद केला की, रवी किशन हे तिचे वडिल आहेत. शिनोवासोबत त्यांचे लहानपणीचे अनेक व्हिडिओ आहेत.शिनोवाच्या वतीने वकिलांनी असा देखील दावा केला की, रवी किशन लहानपणापासूनच तिचा सांभाळ करत आहेत.
शिनोवाकडून डीएनए चाचणीची मागणी
दरम्यान शिनोवाकडून डीएनए चाचणीची मागणी करण्यात आली. पण यापूर्वी तिने तिचे वडिल राजेश सोनी यांचीही डीएनए चाचणी करून घेतली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे राजेश सोनी हे तिचे खरे वडिल नाहीत,हे यावरुन सिद्ध झालं असल्याचं म्हटलं जातंय.
रवी किशन यांच्या वकिलांचा युक्तिवाद
सुनावणीदरम्यान, रवी किशनच्या वतीने वकील अमित मेहता यांनी युक्तिवाद केला. रवी किशन यांचे शिनोवा नावाच्या मुलीची कोणतेही संबंध नाहीत, ती त्यांची मुलगी नाही. रवी किशनची शिनोवाची आई अपर्णा ठाकूर यांच्याशी ओळख होती, असंही यावेळी वकिलांनी म्हटलं. दोघे फक्त चांगले मित्र होते, पण कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते.
शिनोवाच्या वकिलांचा दावा काय?
शिनोवाचे वकील अशोक सरावगी यांनी दावा केला की, अपर्णा ठाकूर जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आल्या आणि रवी किशनच्या संपर्कात आल्या तेव्हा ते प्रेमात पडले. त्यांच्या संबंधातून रवी किशन आणि त्यांना शिनोवा झाली. शिनोवाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, रवी किशन शिनोवाची काळजी घेत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते तिला मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.