OTT Release This Week : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सुरू आहे. ओटीटी (OTT) प्रेमींसाठी हा आठवडा खूपच खास आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. यात हिंदीसह, इंग्रगी, कोरियनसह अन्य भाषांचादेखील समावेश आहे. 


ऑस्कर नामांकित 'पुअर थिंग्स' या आठवड्यात रिलीज होणार आहे. तसेच विनोदवीक सुनील ग्रोव्हरदेखील धमाका करणार आहे. एकंदरीतच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घ्या या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमे आणि वेबसीरिजबद्दल...


एनीवन बट यू (Anyone but You)
कधी रिलीज होणार? 27 फेब्रुवारी
कुठे पाहता येणार? प्राईम व्हिडीओ


'एनीवन बट यू' हा रोमँटिक विनोदी सिनेमा आहे. इंग्रजीसह हिंदीतही हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात सिडनी स्वीनी आणि ग्लेन पॉवेल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच एलेक्जेंड्रा शिप, गाटा, हेडली रॉबिन्सन, मिशेल हर्ड, डर्मोट मुलरोनी, डेरेन बार्नेट, ब्रायन ब्राउन आणि राचेल ग्रिफिथ्स हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


पुअर थिंग्स (Poor Things)
कधी होणार रिलीज? 27 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'पुअर थिंग्स' हा सिनेमा 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ऑस्कर नामांकन प्राप्त या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इंग्रजीसह फ्रेंच आणि पुर्तगाली भाषांमध्येही प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. एम्मा स्टोन, मार्क रफेलो आणि विलियन डॅफो हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.


मामला लीगल है (Maamla Legal Hai)
कधी रिलीज होणार? 1 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'मामला लीगल है' हा कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या सिनेमात रवि किशन, यशपाल शर्मा, अनंत जोशी, नाइला ग्रेवाल, निधी बिष्ट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ही सीरिज 1 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


सनफ्लॉवर सीझन 2 (Sunflower S2)
कुठे पाहता येईल? झी5


डार्क कॉमेडी मर्डर मिस्ट्री 'सनफ्लॉवर' सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना झी 5 वर पाहता येईल. या शोमध्ये सुनील ग्रोव्हर, रणवी शौरी, आशीष विद्यार्थी, अदा शर्मा, गिरीश कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 'सनफ्लॉवर सीझन 2' श्री कपूर यांच्या निधनावर आधारित आहे.


ब्लू स्टार (Blue Star)
कधी रिलीज होणार? 29 फेब्रुवारी
कुठे पाहता येईल? हॉटस्टार


'ब्लू स्टार' हा सिनेमा 29 फेब्रुवारी 2024 रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. एस जयकुमार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अशोक सेलवन, शांतनू भाग्यराज आणि कीर्ति पांडियन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Neha Pendse :  ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे आता ओटीटीवर झळकणार; समोर आली अपडेट