OTT Horror Movies : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) दर आठवड्यात विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. रोमँटिक, अॅक्शन, क्राइम, थ्रिलर, विनोदी चित्रपट आणि वेबसीरिज पाहून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमचा मोर्चा हॉरर चित्रपटांकडे (Horror Movies) वळवायला हवा. ओटीटीवरील या कलाकृती पाहून अंगावर शहारे येतील तसेच थरकाप उडेल. त्यामुळे घरात एकट्याने या वेबसीरिज आणि चित्रपट अजिबात पाहू नका. हे चित्रपट तुम्ही मित्रांसोबत घरी पॉपकॉर्न खात पाहू शकता. हॉलिवूडचे (Hollywood) अनेक चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहेत.
द एक्सोरसिज्म ऑफ एमिली रोज (The Exorcism of Emily Rose) : 'द एक्सोरसिज्म ऑफ एमिली रोज' हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना घाबरायला होईल. हा सिनेमा पूर्णपणे सत्यघटनेवर आधारित नाही. एका एनालीज नामक मुलीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
हेरेडिटेरी (Hereditary) : 'हेरेडिटेरी' हा चित्रपट एनी नामक एका मुलीवर भाष्य करणारा आहे. एनीच्या आईचं निधन होतं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसतो. आईच्या निधनानंतर एनीला तिला भास होतो असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात.
रात (Raat) : राम गोपाल वर्मा यांनी 'रात' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एक कुटुंब नव्या घरात शिफ्ट होतं त्यानंतर या कुटुंबाला अनेक भयावह घटनांचा सामना करावा लागतो ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री रेवतीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये या सिनेमाचा समावेश होतो. झी 5 वर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
वेरोनिका (Veronica) : वेरोनिका हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
द रिचुअल (The Ritual) : द रिचुअल हा चित्रपट नॉर्स मायथोलॉजीवर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
द एमिटीविले हॉरर (The Amityville Horror) : द एमिटीविले हॉरर हा चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.
गेट आऊट (Gate Out) : गेट आऊट हा चित्रपट प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल. एका जोडप्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
द इनविटेशन (The Invitation) : द इनविटेशन हा हॉरर, थ्रिलर चित्रपट आहे. 10 मिनियन डॉलरमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने जगभरात 38 मिलियन डॉलरची कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.
संबंधित बातम्या