Oscars 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास होता. कारण भारतातील दोन चित्रपटांनी हा पुरस्कार पटकावला. बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीतील ऑस्कर पुरस्कार हा भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीने पटकावला. तर आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावला आहे. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा हा जिमी किमेल यांनी होस्ट केला होता. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर या चित्रपटाला जिमी किमेल हा बॉलिवूड चित्रपट म्हणाला. त्यामुळे आता नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. 


ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनाऊंसमेंट करताना जिमी किमेल  हा आरआरआर या चित्रपटाला बॉलिवूड चित्रपट म्हणाला. त्यामुळे आता नेटकरी जिमी किमेलला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने ट्वीट केलं, 'आरआरआर हा साऊथ इंडियन चित्रपट आहे. टॉलिवूड चित्रपट आहे. बॉलिवूड नाही. ऑस्करमधील काही लोक बॉलिवूड म्हणत आहेत.'






एका युझरने ट्वीटमध्ये लिहिलं की, "भारतात वेगवेगळ्या भाषा आहेत. वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्री येथे आहेत. बॉलिवूड म्हणजे हिंदी भाषेतील चित्रपटांची इंडस्ट्री. भारतात हिंदी ही सर्वाधिक जास्त बोलली जाणारी भाषा असल्याने बॉलिवूड हे प्रसिद्ध आहे. आरआरआर हा भारताच्या दक्षिण भागातील तेलुगू भाषेतील चित्रपट आहे."




एका नेटकऱ्याने ऑस्करला फक्त कॉन्ट्रोव्हर्सी आवडते, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्या नेटकऱ्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "ओह, ऑस्करला फक्त वाद आवडतात. चित्रपट निर्माते गेली कित्येक महिने भारतीय चित्रपट म्हणून चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. त्यामुळे RRR चा बॉलिवूड चित्रपट म्हणून उल्लेख केला गेला असावा."






आरआरआर हा पॅन इंडिया चित्रपट आहे. तेलुगूसोबतच हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात रिलीज झाला.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscars 2023 : अटकेपार झेंडा रोवणाऱ्या नाटू नाटू गाण्याचा अर्थ काय?