The Elephant Whisperers: ऑस्कर-2023 (Oscar 2023)  हा पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास ठरला. कारण  या सोहळ्यात भारतानं दोन कॅटेगिरीतील पुरस्कार जिंकले. 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे केअर टेकर्स यांची गोष्ट मांडण्यात आली आहे. नुकतीच 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.  'द एलिफंट विस्परर्स'  या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगानं (Guneet Monga) नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


गुनीत मोंगा यांनी  शेअर केले फोटो


गुनीत मोंगा यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर, आज तुम्हाला भेटून खूप छान वाटले.  तुम्ही आम्हाला वेळ देऊन आमचे मनःपूर्वक कौतुक केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.'






नरेंद्र मोदी यांचे ट्वीट


नरेंद्र मोदी यांनी 'द एलिफेंट व्हिस्पर्स' या माहितीपटाच्या टीमसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं,'द एलिफंट व्हिस्परर्सच्या  चित्रपटाच्या यशाने जागाचे लक्ष वेधून घेतले. तसेच जगभरातील लोकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. आज, मला त्या चित्रपटाच्या टीमला भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे.' 






कुठे पाहू शकता 'द एलिफंट विस्परर्स'?


'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकता. या डॉक्युमेंट्रीमध्ये   तामिळनाडूतील एक कुटुंबाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हे कुटुंब हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं.   


 इतर महत्वाच्या बातम्या:


Guneet Monga: ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा भारतात पोहोचली; विमानतळावर जंगी स्वागत