Oppenheimer OTT Release: हॉलिवूडचा (Hollywood) लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या (Christopher Nolan)  'ओपनहायमर' (Oppenheimer)  या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या हॉलिवूड चित्रपटानं भारतात देखील कोट्यवधींची कमाई केली.  हा चित्रपट यावर्षी 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्रेक्षक कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनहायमर हा चित्रपट पाहू शकणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात..


कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला चित्रपट? (Oppenheimer OTT Release)


अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये  वरुण धवन हा ओपनहायमर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती देताना दिसत आहे. अॅमेझॉन हा चित्रपट  प्राइम व्हिडिओ स्टोअरवर 22 नोव्हेंबरपासून फक्त 149 रुपयेमध्ये  रेंटवर उपलब्ध असेल.


अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये वरुण हा शूटिंग करताना ओपनहायमर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत सांगताना दिसत आहे.






ओपनहायमरची स्टार कास्ट (Oppenheimer Star Cast)


ओपनहायमर या चित्रपटात  सिलियन मर्फीनं मुख्य भूमिका साकारली आहे. एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, आणि फ्लॉरेन्स पग यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  


ओपनहायमरचं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Oppenheimer Box Office Collection)


826 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ओपनहायमर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाचे जगभरात 6050 कोटींचे कलेक्शन होते, तर भारतात 'ओपनहायमर' ने 130 कोटी रुपयांचे  कलेक्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.


 चित्रपटाचं कथानक


'ओपनहायमर' हा चित्रपट एक बायोग्राफी ड्रामा  आहे. 'ओपनहायमर' हा सिनेमा जे. रॉबर्ट ओपेनहायमर  (J. Robert Oppenheimer) यांच्या आयुष्यावरआधारित सिनेमा आहे ज्यांना अणुबॉम्बचे जनक देखील म्हटलं जातं. या चित्रपटात ओपेनहायमरच्या पहिल्या अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल दाखवण्यात आलं आहे. 






संबंधित बातम्या:


Oppenheimer : 'ओपनहाइमर' पाहिला नाही म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणताच सिनेमा पाहिलेला नाही : राम गोपाळ वर्मा