Shah Rukh Khan Gauri Mecca Photo Fact Check: बॉलिवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) म्हणजे, बॉलिवूडच्या मोस्ट लव्हेबल आणि फेवरेट कपल्सपैकी एक. शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी आणि त्यानंतरचा सुखी संसार संपूर्ण देशच नाहीतर, जगभरात एक उदाहरण म्हणून पाहिलं जातं. दोघांच्या लग्नाला 33 वर्ष झाली, दोघांनाही तीन मुलं आहेत. अशातच सध्या शाहरुख खान पत्नी गौरी खानचा धर्म बदलल्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मोठा मुलगा आर्यन खान यांचे मक्का येथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, या फोटोंवरुन शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला नेत गौरी खानचा धर्म बदलल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे सध्या खळबळ माजली आहे.  




शाहरुख-गौरीचा Photo Viral 


सोशल मीडियावर शाहरुख खान, गौरी खानचा फोटो व्हायरल होत आहे. तसेच, शाहरुखनं गौरीला मक्केला नेत तिचा धर्म बदलल्याचा दावा केला जात आहे. शाहरुख उमराह लूकमध्ये दिसून येत आहेत. तसेच, मक्केला जशा मुस्लिम महिला उमराहसाठी जातात, तशाच अंदाजात गौरी खान दिसत आहे. शाहरुख-गौरीच्या व्हायरल फोटोमागे पाक खाना-ए-काबाही दिसत आहे. 




सोशल मीडियावर शाहरुख खान आणि गौरी खानच्या या फोटोनं खळबळ माजवली आहे. या फोटोवर सध्या नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांमध्ये फोटोवरुन जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुख-गौरीचा हा फोटो खरा की खोटा? यावरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहेत. अशातच दोघांच्या व्हायरल फोटोचं फॅक्ट चेक केलं. त्यानंतर शाहरुख आणि गौरीचा हा फोटो खोटा असल्याचं सत्य समोर आलं आहे. शाहरुखनं गौरीचं धर्म परिवर्तन केलेलं नाही. हा फोटो AI जनरेटेड असल्याचं खळबळजनक सत्या फॅक्ट चेकमधून समोर आलं आहे. 




दरम्यान, अनेक सेलिब्रिटी AI जनरेटेड फोटोंमुळे हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर AI टूल्सचा वापर करुन सेलिब्रिटींची अनेक वादग्रस्त आणि खळबळजनक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अनेकदा AI जनरेटेड फोटो एवढे खरे वाटतात की, खोटी माहिती चौफेर पसरते आणि गोंधळ उडतो. फेक फोटो वापरुन अनेक अफवा पसरवल्या जातात. असंच काहीसं शाहरुख आणि गौरीच्या फोटोबाबत झाल्याचं सत्य समोर आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Highest Grossing Film On New Year: नव्या वर्षात 'या' फिल्मनं 8 अब्ज कमावले, बॉक्स ऑफिसचं रेकॉर्ड मीटर चक्काचूर; कमाईत 'पुष्पा 2' आसपासही नाही, तुम्ही पाहिलाय?