मुंबई : सध्या अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सिंघम अगेन यासारखे चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. भूलभूलैया-3, द साबरमती रिपोर्ट हे चित्रपट पाहण्यासाठीदेखील सिनेरसिक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहेत. दरम्यान, चित्रपट प्रत्येकालाच पाहावा वाटतो. पण तिकिटाची किंमत जास्त असल्यामुळे अनेकजण चित्रपटगृहात जाणं टाळतात. सध्या मात्र सिनेरसिकांना एक मोठी संधी चालून आली आहे. कारण अनेक ठिकाणी आज कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहायला मिळणार आहे.
फक्त 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट
मिळालेल्या माहितीनुसार अनेक मल्टिप्लेक्स चैन ब्लॅक फ्रायडेनिमित्त सिनेमा लव्हर्स डे (Cinema Lovers Day) साजरा करत आहेत. याच सिनेमा लव्हर्स डेनिमित्त अनेक मल्टिप्लेक्सकडून कोणताही चित्रपट अवघ्या 99 रुपयांत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सेनेपोलीस इंडिया, मिराज सिनेमाज, मुव्ही मॅक्स आदी मल्टिप्लेक्स चैन यात सहभागी होत आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या कंपनीच्या कोणत्याही चित्रपटगृहांत कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे.
कोणकोणते चित्रपट 99 रुपयांत पाहता येणार?
मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 29 नोव्हेंब रोजी भूलभूलैया-3, द साबरमती रिपोर्ट, सिंघन अगने, कंगुवा, आय वॉन्ट टू टॉक, ग्लॅडीएटर्स-2, विक्ड असे नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट तुम्हाला फक्त 99 रुपयांत पाहायला मिळणार आहे. तर रिरिलीज झालेले बिवी नंबर-1, करण अर्जुन, कल हो ना हो हे चित्रपटही फक्त 99 रुपयांत पाहण्याची संधी आहे.
अनेक मल्टिप्लेक्स कंपन्यांनी केलं जाहीर
सिनेमागृहांकडून दिल्या जाणाऱ्या या ऑफर्सबाबत पिव्हीआर आणि आयनॉक्सने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम खात्यावर माहिती दिली आहे. नुकतेच रिलिज झालेले चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहा, असं या कंपन्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
पण नेमक्या अटी काय?
सनेमा लव्हर्स डेनिमित्त 99 रुपयांत चित्रपट पाहण्याची संधी असली तरी सर्वच चित्रपटांसाठी हा नियम लागू नाही. प्रिमियम मुव्ही फॉरमॅट असणाऱ्या चित्रपटांसाठी हा नियम लागू नसेल. म्हणजेच 3D, 4DX 3D, IMAX 3D आणि recliners चित्रपट तुम्हाला मूळ तिकीट देऊनच पाहता येईल.
हेही वाचा :
3 सेकंदांची क्लीप अन् तब्बल 10 कोटींचा दावा, नयनतारा-धनुष यांच्यात टोकाचा वाद, नेमकं प्रकरण काय आहे?