Oonchi Oonchi Waadi OMG 2 Song:  अभिनेता अक्षय कुमार  (Akshay Kumar) आणि अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा ओएमजी-2 (OMG 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतेच या चित्रपटामधील 'ऊंची ऊंची वादी' (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.


पंकज त्रिपाठी यांनी ओएमजी-2 या चित्रपटात कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारली आहे. 'ऊंची ऊंची वादी' या गाण्याच्या सुरुवातीला कांती शरण मुद्गल हे मंदिरात जाऊन  प्रार्थना करताना दिसत आहेत. तर कांती शरण मुद्गल हे संकट आल्यानंतर महादेवाकडे प्रार्थना करतात, असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात अक्षय कुमारची झलक देखील बघायला मिळत आहे. "रख विश्वास, तू है शिव का दास" हा अक्षय कुमारचा डायलॉग गाण्यामध्ये ऐकायला मिळतो.


हंसराज रघुवंशी यांनी  'ऊंची ऊंची वादी' हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याचे गीतकार कबीर शुक्ला, हंसराज रघुवंशी, , डीजेस्ट्रिंग्स हे आहेत. या गाण्याला संगीत हंसराज रघुवंशी, राही, डीजेस्ट्रिंग्स हे आहेत. 'ऊंची ऊंची वादी' या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.


'ऊंची ऊंची वादी' हे गाणं अक्षय कुमारनं सोशल मीडियावर शेअर केलं. या गाण्याला अक्षयनं कॅप्शन दिलं, 'भोले शंकर'






ओएमजी-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.


ओएमजी (OMG) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात परेश रावल आणि अक्षय कुमारनं प्रमुख भूमिका साकारली होती. आता 11 वर्षानंतर ओएमजी या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होत आहे.  ओएमजी-2  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


OMG 2 Teaser Out: "रख विश्वास, तू है शिव का दास"; ओएमजी-2 चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस