मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


अखेरच्या काळात ओम पुरी अनेक वादात अडकले. काही कौटुंबीक तर काही सामाजिक वाद होते.

ओम पुरी यांची वादग्रस्त वक्तव्य

1) उरी हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात चर्चा करताना, ओम पुरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

"जवान शहीद होतात तर त्यांना सैन्य दलात भरती व्हायला कोणी सांगितलं, हातात बंदूक घ्यायला कोणी सांगितलं", असं ओम पुरी म्हणाले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता.

मात्र ओम पुरी यांनी या वक्तव्याबद्दल ओम पुरींनी उत्तरप्रदेशमधील इटावाच्या शहीद जवान नितीन यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली होती.

2) आण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील उपोषणावेळी ओम पुरी यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी ओम पुरी यांनी राजकीय नेत्यांवर सडेतोड भाषेत टीका केली होती.

"आयएएस, आयपीएस अधिकारी अंगठेबहाद्दर नेत्यांना सलाम ठोकतात तेव्हा मला लाज वाटते. या अंगठेबहाद्दरांची पार्श्वभूमी काय? अर्ध्याहून अधिक खासदार अडाणी आहेत" असं ओम पुरी म्हणाले होते.

मात्र वाद उफाळल्यानंतर ओम पुरी यांनी माफी मागत, मी संसद आणि संविधानाचा आदर राखतो, मला भारतीय असल्याचा गर्व आहे असं म्हटलं होतं.

3) आमीर खानने कथितरित्या असहिष्णुतेबाबत वक्तव्य केलं होतं. पत्नी किरणने देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं आमीर म्हणाला होता.

यावर ओम पुरी म्हणाले होते, "आमीर आणि त्याची पत्नी असा विचार करु शकतात हे ऐकून मी हैराण झालो. असहिष्णुतेबाबत आमीर खानचं वक्तव्य सहन करण्यासारखं नाही. आमीरचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. असं वक्तव्य करुन तुम्ही तुमच्या समुदायाला भडकवत आहात, की तयार राहा, लढा किंवा देश सोडा"

4) गोहत्याबाबत उफाळलेल्या वादाबाबतही ओम पुरी यांनी वक्तव्य केलं होतं. "ज्या देशात बीफ निर्यात करुन डॉलर कमावले जातात, तिथे गोहत्याबंदी हा पाखंडीपणा आहे", असं ओम पुरी म्हणाले होते.

5) नक्षलवाद्यांबाबत ओम पुरी म्हणाले होते, "नक्षलवादी हे दहशतवादी नव्हे तर फायटर आहेत. ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. नक्षलवादी सामान्य माणसाला त्रास देत नाहीत"

6) ओम पुरींनी पंतप्रधान मोदींबाबतही वक्तव्य केलं होतं. "सध्या आपल्याकडे मोदींच्या कडेवर बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी आपण अन्य लोकांच्या कडेवर बसून अनुभव घेतला आहे.