मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


ओम पुरी यांची कारकीर्द:

ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये हरियाणामध्ये झाला होता.

आपलं प्राथमिक शिक्षण त्यांनी ननिहाल पंजाबच्या पटियालामधून पूर्ण केलं होतं.

1976 साली पुण्यातील एफटीआय मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वत:चा थिएटर ग्रुप 'मजमा'ची स्थापना केली होती.

ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकीर्दीची सुरुवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा 'घाशीराम कोतवाल'पासून सुरुवात केली होती. 1980 साली आलेल्या 'आक्रोश' सिनेमानं त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली. आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका फारच गाजली होती.



1993 साली ओम पुरी यांचं नंदिता पुरी यांच्याशी लग्न झालं होतं. पण 2013 साली ते विभक्त झाले होते. ओम पुरी यांचा एक मुलगा असून त्याचं नाव इशान आहे.

‘अर्धसत्य’, ‘जाने भी दो यारों’, ‘नसूर’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘देहली 6’, ‘मालामाल वीकली’, ‘डॉन’, ‘रंग दे बसंती’, ‘दीवाने हुए पागल’, ‘क्यूँ ! हो गया ना’, ‘काश आप हमारे होते’ आणि ‘प्यार दीवाना होता है’ यासारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये त्यांनी खास भूमिका साकारल्या आहेत.

आतापर्यंत त्यांनी तब्बल 124 सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सिनेसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.