Rakhi Sawant New Film Rowdy Rakhi : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडत असताना राखीने आता करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलत राखीने अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे. अशातच आता 'ड्रामा क्वीन'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'रावडी राखी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान राखीच्या नव्या सिनेमाची घोषणा तिच्या भावाने राकेशने केली आहे. 'ड्रामा क्वीन'च्या आगामी सिनेमाचं नाव 'रावडी राखी' (Rowdy Rakhi) असं असणार आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेश करणार आहे. 


ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राकेश म्हणाला,'राउडी राखी' हा सिनेमा मी करत असल्याचं वृत्त खरं आहे. राखी खरोखरच रावडी आहे. तिला त्रास देणाऱ्या लोकांना ती तिच्या पद्धतीने सरळ करते. राखीने तिचा पती आदिलला देखील (Adil Khan Durrani) चांगलाच धडा शिकवला आहे". 






तगडी स्टारकास्ट असलेला राखीचा 'रावडी राखी'


'रावडी राखी' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमात राखी मुख्य भूमिकेत असण्यासोबत अनेक दिग्गज कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. असरानी, मनोज जोशी, सयाजी शिंदे आणि अनु कपूर या सिनेमात दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप राखीने यासंदर्भात भाष्य केलेलं नाही. राखीच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमात राखीची भूमिका कोण साकारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


राखीचा पती आदिल खान पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीने तिच्या पतीवर मारहाण, फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधासारखे अनेक आरोप केले आहेत. पतीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर राखीने दुबईत अभिनय कार्यशाळा आणि डान्स क्लास सुरु केली आहे. तसेच एका म्युझिक व्हिडीओवर देखील ती काम करत आहे. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचं मोठं पाऊल; दुबईत सुरु केली अभिनयाची कार्यशाळा