मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांना हात घातला. यामध्ये राजकारणासह, सामाजिक, शैक्षणिक आणि बॉलिवूडवरही भाष्य केलं.


राज ठाकरे यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं. हे सिनेमे सरकार पुरस्कृत आहेत, हे काम करायला अक्षय कुमार आहे.  असं राज ठाकरे म्हणाले.

2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे 

याचवेळी राज ठाकरे यांनी अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन निशाणा साधला. भारत, भारत करणारा अक्षय कुमार स्वतःच भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

अक्षय, आलिया, दीपिका; हे बॉलिवूड कलाकार भारताचे नागरिक नाहीत!

राज ठाकरेंचा हा दावा खरा आहे. अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.

कॅनडाचं मानद नागरिकत्व

अक्षय कुमारला कॅनडाने मानद नागरिकत्व दिलं. भारत सरकार दोन नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेता होण्यापूर्वी तो दिल्लीत लहानाचा मोठा झाला. यानंतर मार्शल आर्ट्स तो बँकॉकमध्ये शिकला.

परंतु वेगळ्या देशाचं नागरिकत्व असलेला अक्षय कुमार एकमेव भारतीय कलाकार नाही.

दीपिका डेन्मार्कची नागरिक

या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणचाही समावेश आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाल्याने तिला डेन्मार्कचं नागरिकत्व मिळालं आहे. परंतु ती बंगलोरमध्येच मोठी झाली.

आलिया ब्रिटीश नागरिक

आलिया भटकडेही भारताचं पासपोर्ट नाही. आलिया ब्रिटीश नागरिक आहे. तिची आई सोनी रझदानही ब्रिटीश नागरिक आहे. त्यामुळे ब्रिटीश नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व आणि पासपोर्ट स्वीकारल्यावरच आलियाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.



आमीर खानचा भाचा अमेरिकन नागरिक

अभिनेता आमीर खानचा भाचा अभिनेता इम्रान खानही भारताचा नागरिक नाही. इम्रान खानकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. म्हणजेच तो अमेरिकन नागरिक आहे.



कतरिना कैफ

भारतात राहणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींची यादी इथेच संपत नाही. या यादीतील पुढचं नाव म्हणजे कतरिना कैफ. कतरिना ब्रिटीश नागरिक आहे.

बॉलिवूडमध्ये हळूहळू जम बसवलेली जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकेची नागरिक आहे हे सर्वज्ञात आहे.

नर्गिस फाकरीकडे अमेरिकन पासपोर्ट आहे.

तर बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियॉनीही भारतीय नागरिक नाही. तिच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे.

संबंधित बातम्या

2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे  

अक्षय, आलिया, दीपिका; हे बॉलिवूड कलाकार भारताचे नागरिक नाहीत!

VIDEO: