चित्रपटात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारत आहे. झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाई यांच्या विश्वासू सैनिक होत्या. महिला सैन्यदलाच्या त्या सेनापती होत्या. हिरव्या आणि लाल रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे अतिशय सुंदर दिसत आहे.
"सिनेमातील आपल्या वाट्याचं चित्रीकरण अंकिताने पूर्ण केलं आहे. झलकारी बाई यांच्याबाबत मी कधीही ऐकलं नव्हतं, पण त्या भारताच्या इतिहासातील मोठ्या योद्ध्या होत्या. पडद्यावर त्यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे," असं अंकिता म्हणाली.
'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट 19 व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. मात्र चित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याच्या आरोपावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
अनेक महिन्यांपासून चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित 'मणिकर्णिका' चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगनासोबतच निहार पांड्या, सोनू सूद या चित्रपटात झळकणार आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र तो आता 3 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होईल.
संबंधित बातम्या
'पद्मावत'नंतर कंगनाच्या 'मणिकर्णिका'विरोधात आंदोलन
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
दीपिकाचा एक्स निहार पांड्याचं कंगनासोबत बॉलिवूड पदार्पण
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल अंदाज