अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावरील आपल्या फोटो आणि डान्स व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कोरिओग्राफर मेलव्हिन लुईस सोबत 'पपीता' गाण्यावर मस्त डान्स करत आहे. नोरा फतेहीचा हा (Nora Fatehi Dance) व्हिडिओ मेलविन लुईसने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेल वर शेअर केला आहे. नोराचा हा डान्स व्हिडिओ वर्ष 2019 चा आहे. हा डान्स व्हिडिओ पाहणारे चाहते नोराच्या डान्स मूव्हसचे खूप कौतुक करीत आहेत आणि कमेंट करतानाही दिसतात.



दुसरीकडे, नोरा फतेहीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कोट्यावधींचे दागिने आणि चमकीदार ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. नोरा तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते आणि तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधून हेच सिद्ध होत आहे. या व्हिडीओमध्ये डान्स व्यतिरिक्त नोरा फतेहीची हटके स्टाईल दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावला असून लोक भरभरुन व्यक्त होत आहेत. नोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शायनिंग ड्रेससह तिच्यावर ज्वेलरी उठून दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये पोज देताना दिसत आहे.




चंदेरी दुनियेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर नोरा फतेही हिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'रोअर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन' मधून केली. अलीकडेच रोना पंजाबी गाण्यात 'नाच मेरी राणी' मध्येही ती बेली डान्स करताना दिसली. या गाण्यामध्ये गुरु रंधावांनी आवाज दिला असून आतापर्यंत हे गाणे 20 कोटीहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.