बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) नुकतीच तिच्या 'कुसू कुसू' या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दिलबर गर्ल तिच्या या गाण्याचं जोरदार प्रमोशन करतानाही पाहायला मिळतेय. यातच आता नोराचं एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये नोरानं तिच्या 'कमरीया' गाण्यावर ठुमके लगावले आहेत.


नोरा फतेहीनं नुकतीच 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' च्या सेटवर हजेरी लावली. नोरानं सेटवर स्पर्धकांसोबत तिच्या 'कमरीया' गाण्यावर डान्स केला. 'इंडियाज बेस्ट डान्सर 2'च्या आगामी भागाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नोरा फतेही दोन स्पर्धकांसोबत डान्स करताना पाहायला मिळतेय.


व्हिडीओ पाहा :


 



 


निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये 'कमरीया' गाण्याच्या तालावरील नोरा फतेहीचा डान्स इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते पुन्हा तिच्या ठुमक्यांना घायाळ झाल्याचं पाहायला मिळतंय. याच कारणामुळे 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' च्या सेटवरील नोराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत उतरलाय.


अभिनेत्री नोरा फतेहीसोबत अभिनेत्री दिव्या खोसला कुमारनं ही या शोमध्ये हजेरी लावली. दिव्या तिच्या 'सत्यमेव जयते 2' चित्रपटाचं प्रमोशन करताना पाहायला मिळाली. शोच्या या भागामध्ये अभिनेता चंकी पांडे आणि अभिनेत्री नीलम कोठारीही झळकणार आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha