Swara Bhaskar Baby: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ने आई होण्याचा निर्णय घेतलाय. स्वरा भास्कर 33 वर्षाची असून तिनं अजून लग्न केलेलं नाहीय. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ने आई होण्याचं ठरवलंय. स्वरा भास्कर 33 वर्षाची असून अविवाहित आहे. स्वरा भास्करने मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरानं यासाठीच तयारी सुरु केली आहे. तिच्या या निर्णयामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने संभाव्य दत्तक पालक म्हणून नाव नोंदवलं आहे. स्वरा सध्या मूल दत्तक घेण्यासाठी प्रतिक्षा यादीत आहे.


स्वरा भास्करनं नुकत्याच एका मुलाखतीत आई बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासोबतच तिने देशातील अनेक अनाथ मुलांबाबतही सांगतिलं होतं, जे अनाथाश्रमात राहतात. स्वरानं मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरु केली असून तिनं मुलं दत्तक घेतलेल्या कुटुंबांसोबतही भेटीगाठी केल्या आहेत.



एका वृत्तपत्रासोबत बोलताना स्वरा भास्करनं सांगितलं की, ''मला कुटुंब आणि बाळ असावं अशी इच्छा आहे. मुलं दत्तक घेणं हा असा पर्याय आहे ज्यात मी माझी इच्छा पूर्ण करु शकते. मी नशीबवान आहे की, आपल्या देशात अविवाहित महिलेला मुलं दत्तक घेण्याची परवानगी आहे. मी दरम्यानच्या काळात मुलं दत्तक घेतलेल्या दाम्पत्यांना भेटली आहे. त्यासोबतच अनेक मुलांची भेट घेतली आहे जे आता प्रौढ झाले आहेत. मी त्यांच्या प्रक्रिया आणि अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतेय.''


स्वरा भास्करनं खूप अभ्यास करुन निष्कर्ष काढत मुलं दत्तक घेण्याचा निर्णय तिच्या आईवडीलांना सांगितला. स्वराच्या या निर्णयाला तिच्या आईवडीलांनी सहमती दर्शवली आहे. स्वराने सांगितलं की, ''मी CARAद्वारे मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरु केलीय. मला यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. या प्रक्रियेला तीन वर्षही लागू शकतात. मात्र, आई होण्यासाठी आपण उत्सुक असल्यानं आता वाट बघणं माझ्यासाठी कठीण झालंय.''


स्वरा भास्कर आगामी 'शीर कोरमा' या लघुपटामध्ये झळकणार आहे. या लघुपटात स्वरा समलिंगी व्यक्तिरेखा निभावताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमही दिसणार आहेत. याचे दिग्दर्शक फराज अंसारी आहेत.


हे ही वाचा :


Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली...


Anil kapoor : गंभीर आजाराशी झुंज देत आहेत अनिल कपूर? व्हिडीओ केला शेअर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha