Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एडलवाईज कंपनीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप आहे.
नितीन देसाईंच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये एडलवाईज कंपनीचेच नाव असल्याची पोलिसांची माहिती आहे. अंत्यसंस्कार झाल्यावर कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्थिक अडचणी वाढल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
2016 साली नितीन देसाईंच्या एनडीज आर्ट कंपनीने एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. एडलवाईज कंपनीकडून त्यांनी 2016 मध्ये 150 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा एकदा 35 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यात आले. 2020 पासून कोरोना आणि टाळेबंदीमुळे कंपनीचे कर्जाचे हप्ते थकण्यास सुरुवात झाली. नितीन देसाई यांच्या कर्जाची एकूण थकबाकी 252 कोटी रुपये इतकी होती.
एनसीएलटीकडे केस सुरू असतानाच मूळ अर्जदार सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीनंदावा दाखल केला होता. सुनावणी सुरू असतानाच त्यांनी सर्व दायित्व आणि दाव्यासंबंधीच्या गोष्टी एडेल्वाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शनकंपनीकडे वर्ग केला. याप्रकरणी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कंपनीनं न्यायधिकरणाकडे दाद देखील मागितली मात्र त्यांचे अपीलफेटाळण्यात आले. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी दाखल केलेले त्यांचे अपील आणि त्यांच्याविरोधात आलेला निर्णय तसेच 2 ऑगस्ट रोजी कला दिग्दर्शक यांनी उचललेलं टोकाचं पाऊल याचा संबंध जोडला जात आहे.
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्वसामान्य लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
शवविच्छेदनानंतर नितीन देसाईंचं पार्थिव कर्जतमधील एनडी स्टुडिओकडे रवाना करण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. नितीन देसाईंच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती का?, त्यांच्याकडून स्टुडिओ जबरदस्तीनं ताब्यात घेतला जात होता का?, या सर्व बाबींचा तपास केला जाईल. मात्र नितीन देसाईंच्या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर एक शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या