Web Series Sequel Releasing In 2022 : येणारे नवे वर्ष वेबसीरिजच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. 2022 मध्ये अनेक चांगल्या वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. अनेक गाजलेल्या वेबसीरिजचे सिक्वेलदेखील 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 


पंचायत 2
अॅमेझॉन प्राइमच्या पंचायत (Panchayat) या वेबसीरिजमध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), नीना गुप्ता (Neena Gupta) आणि रघुवीर यादव (Raghubir Yadav)मुख्य भूमिकेत होते. या वेबसीरिजचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. जितेंद्रच्या अभिनयादेखील खूप कौतुक झाले. पंचायत ही वेबसीरिज गेल्या वर्षी प्रदर्शित झाली होती. सध्या या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू असून ही वेबसीरिज 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


दिल्ली क्राइम 2
दिल्लीतील बलात्कार प्रकरणावर भाष्य करणारी 'दिल्ली क्राइम 2' ही वेबसीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. ही वेबसीरिज जगभरातील चाहत्यांना आवडली. त्यामुळे प्रेक्षक आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत. दिल्ली क्राइमचा दुसरा सीझन 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मेड इन हेवन 2
'मेड इन हेवन' ही एक लोकप्रिय वेबसीरिज आहे. 'मेड इन हेवन'चा दुसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मेड इन हेवन'च्या दुसऱ्या भागाचे शूटिंगदेखील सुरू झाले आहे. 'मेड इन हेवन' ही वेबसीरिज 2019 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती. 


असुर 2
असुर ही वेबसीरिज प्रचंड गाजली आणि लोकप्रियदेखील झाली. या वेबसीरिजमध्ये असुर ही वेबसीरिज खूप गाजली आणि लोकप्रियही झाली. अरशद वारसी (Arshad Warsi) आणि बरुण सोबती (Barun Sobti) या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत होते. असुरच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाले असून लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Viral Video : भाईजान झाला 'रिक्षावाला', Salman Khan ने पनवेलमध्ये चालवली ऑटो रिक्षा


Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस


Arjun Kapoor Corona Positive : कपूर कुटुंबात कोरोनाचा शिरकाव; अर्जुन, अंशुला आणि रियाला कोरोनाची लागण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha