मुंबई : सध्या सुरक्षाबंधन नावाची एक शॉर्टफिल्म यू ट्यूबवर ट्रेंडिंग आहे. 3 मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये भावा-बहिणीच्या नात्यासोबतच हेल्मेटच्या वापराला एका आगळ्यावेगळ्या ढंगात दाखवण्यात आलं आहे.

 

या शॉर्टफिल्मची निर्मिती वेबवाले प्रॉडक्शनने केली आहे. "नात्यांना काही बंधन नसतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा." असा संदेश या फिल्ममधून दिला आहे. सुमीत कोमुर्लेकर यांनी या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन केलं आहे.

 

या व्हिडीओला यूट्यूबवर अनेक हिट्स मिळाल्या आहेत. तसंच ही शॉर्टफिल्म फेसबूकवरही मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर मिळवत आहे.

 

पाहा व्हिडीओ :