मुंबई : बॉलिवूड स्टार रितेश देशमुखच्या आगामी 'बँजो' सिनेमातील 'बाप्पा' या गाण्याचा व्हिडीओ रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रितेशचा जबरदस्त लूक पाहायला मिळला होता. मराठीतील 'लय भारी' या सुपरहीट सिनेमानंतर रितेशचा असा अंदाज 'बँजो'मध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
'बँजो' सिनेमा चार संगीत कलाकारांच्या संघर्षावर आधारित आहे. मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रितेशसह बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाकरी दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 23 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रवी जाधव बँजो चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘बँजो कलाकार हे गेल्या 100 हून अधिक वर्षांपासून मुंबईचा अविभाज्य भाग आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. बँजोवादक सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता काम करतात. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या हिरोने त्याच्या कलेतूनच कशी उभारी घेतली, हे आम्हाला दाखवायचं होतं. सगळेच हिरो बाईक, कार किंवा घोड्यावरुन स्क्रीनवर एन्ट्री घेतात, माझा हिरो गटारातून येईल’ असं दिग्दर्शक रवी जाधवने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
पाहा व्हिडीओ