Liger New Poster Released : करण जोहरचा (Karan Johar) 'लायगर' (Liger) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


करण जोहरने आता 'लायगर' सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे," 'लायगर' सिनेमा प्रदर्शित व्हायला आता फक्त 50 दिवस बाकी आहेत. या सिनेमातील पहिलं गाणं 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 8 जुलैला या गाण्याचा प्रोमो व्हिडीओ रिलीज करण्यात येणार आहे". 






25 ऑगस्टला 'लायगर' होणार रिलीज


'लायगर' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये विजय आणि अनन्या पांडे रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या सिनेमासाठी विजयने कोट्यवधींचे मानधन घेतले आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक पुरी जगन्नाथ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा सिनेमा 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 


 'लायगर'मध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश


दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.


संबंधित बातम्या


Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!


Disha Patani: 'पुष्पा' ते 'लायगर'; दिशानं रिजेक्ट केल्या या बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स