5 New Movies and Shows Releasing on Friday 17th : 2021 संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच 2022 सुरू होणार आहे. 2021 वर्ष संपण्यापूर्वी कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आहेत जाणून घ्या. हे सिनेमे नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. झी 5, सोनी लिव्ह, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या शुक्रवारी अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
DECOUPLED – NETFLIX : 'DECOUPLED' ही नेटफ्लिक्सची विनोदी सीरिज ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. आर माधवन आणि सुवरिन चावला या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तसेच राज विश्वकर्मा, दिलनाज इराणी, अतुल कुमार आणि सिद्धार्थ शर्मा यांच्यादेखील या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत.
THE WITCHER S2 – NETFLIX : सोडेनच्या लढाईत येनेफरचे आयुष्य संपले यावर विश्वास ठेवून, रिव्हियाचा गेराल्ट राजकुमारी सिरिलाला सर्वात सुरक्षित ठिकाणी, म्हणजे त्याच्या बालपणीच्या घरी आणतो. असे या सीरिजचे कथानक आहे.
FUFFAD JI – ZEE5 : पंजाबी सिनेमाचा आनंद घेण्यासाठी पंकज बत्राचा
फुफाड सिनेमा सज्ज आहे. हा चित्रपट दोन मेहुण्यांभोवती फिरतो जे आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून त्यात सामाजिक संदेशही आहे. या चित्रपटात बिन्नू ढिल्लॉन, गुरनाम भुल्लर, जस्मिन बाजवा आणि जस्सी गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
WITH LOVE – AMAZON PRIME VIDEO : या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांच्या यादीत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'WITH LOVE' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. एमेराउड टुबिया, मार्क इंडेलिकाटो, इसिस किंग आणि व्हिन्सेंट रॉड्रिग्ज यात मुख्य भूमिकेत आहेत.
420 IPC - ZEE5 : बन्सी केसवानीच्या क्लायंटला सीबीआयने 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक केली, तेव्हा त्याच्या दुसऱ्या क्लायंटने त्याच्यावर 50 लाख रुपयांचे तीन कोरे धनादेश चोरल्याचा आणि बनावट चेक केल्याचा आरोप केला. हा आरोप त्याचे आयुष्य बदलून टाकतो. आता प्रश्न पडतो की तो दोषी आहे की नाही? असे या सिनेमाचे कथानक आहे. विनय पाठक, रणवीर शौरी, गुल पनाग आणि रोहन विनोद मेहरा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Raj Kundra case : राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात मोठा दिलासा, तूर्तास अटकेपासून संरक्षण
Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?