सोनाक्षीने बिकिनी ब्लाऊजसोबत स्कर्ट घातला होता आणि त्यावर ओढणी घेतली होती. परंतु वर्स्ट ड्रेसच्या श्रेणीत सोनाक्षी सिन्हाचं नाव वरच्या क्रमाकांवर होतं.
आयफामधील सोनाक्षी सिन्हाच्या लूकवर बरीच उलट सुलट चर्चा पाहायला मिळाली. या लूकवरुन नेटीझन्सनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं. काहींनी तिची तुलना पोपटाशी केली तर काहींनी मॅचिंग ओढणी मिळाली नाही, असा प्रश्नही विचारला.
दरम्यान, तिचा हा लूक आगामी सिनेमाच्या हेतूने करण्यात आला होता. मात्र याच लूकमुळे सोनाक्षीला टीकेचा सामना करावा लागला.