आसामी अभिनेत्री-गायिकेची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2017 10:12 PM (IST)
आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेझबरुआ हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळ आसामच्या गुवाहाटीची रहिवासी असलेली बिदिशा गुरुग्राममधील सुशांत लोक भागात राहत होती.
गुरुग्राम : आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेझबरुआ हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळ आसामच्या गुवाहाटीची रहिवासी असलेली बिदिशा गुरुग्राममधील सुशांत लोक भागात राहत होती. बिदिशाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. तिच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असल्याचं म्हटलं जातं. वर्षभरापूर्वीच ती गुजरातचा रहिवासी असलेल्या नितीश झासोबत विवाहबंधनात अडकली होती. बिदिशाच्या अभिनय कौशल्यामुळे तिला आसामी प्रेक्षकांनी गौरवलं होतं. इंग्रजी वाड्मय विषयातून तिने पदवी घेतल्यानंतर अभिनय आणि गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. बिदिशाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.