मुंबई : नेटफ्लिक्सवरील सुरपहिट वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स-2' चा नवा टीझर समोर आला आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरु आहे. आज नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर सेक्रेड गेम्स-2 चा दुसरा टीझर शेअर केला आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन 15 ऑगस्टपासून नेटफिल्क्सवर स्ट्रीम होणार आहे.
दुसऱ्या टीझरमध्ये सुरवीन चावला साकारत असलेल्या 'जोजो' या भूमिकेची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जोजो आणि गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दिकी) यांच्या फोनवरील संभाषण टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. टीझरमध्ये दोघांमधील नातं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
नेटफ्लिक्सने हा टीझर शेअर करताना 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल गणेश गायतोंडेच्या काही टिप्स" असं कॅप्शन दिलं आहे.
'जोजो' ही व्यक्तीरेखा सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनमध्ये सुरुवातीला दाखवण्यात आली होती. गणेश गायतोंडे तिची गोळी घालून हत्या करतो. याआधी जोजो त्याची खिल्ली उडवत असते आणि म्हणते कसं मी तुला 20 वर्ष मुर्ख बनवलं, असं दाखवण्यात आलं आहे.
सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनमध्ये गणेश गायतोंडे केनियामध्ये जाणार आणि क्राईम किंग बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या सीजनमध्ये कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी हे देखील दिसणार आहे. 'मेड इन हेवन'मधील शोभिता धुलिपाला आणि 'मिर्जापूर'मधील हर्षिता गौरही महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे.
सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. यंदा हा सीझन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शिक केला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होतं. मात्र आता 15 ऑगस्टपासून या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.