Squid Game Web Series : नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमात एका पेक्षा एक सरस वेब सीरिज येत आहेत. मागील महिन्यात 17 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर Squid Game नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. याच वेबसीरिजने एका महिन्यात अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. जगभरातील लोकांना ही वेब सीरिज आवडत आहे. 


नेटफ्लिक्सने या वेब सीरिजचे कौतुक करताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले होते,"साउथ कोरियाच्या Squid Game या वेबसीरिज सारखी मोठी वेबसीरिज पहिल्यांदाच लॉन्च करत आहोत. लोकप्रियतेबाबत देखील Squid Game या वेबसीरिजने अनेक वेबसीरिजला मागे सोडत पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रेक्षकांमध्येदेखील या वेबसीरिजची उत्सुकता दिसून येते. या वेब सीरिजवर आधारित एक अलार्म क्लॉकदेखील लॉन्च करण्यात येणार आहे. या वेब सीरिजची खासियत म्हणजे, मुंबई पोलिस Squid Game वेबसीरिजमधील एक छोटा व्हिडीओ लोकांना दाखवत त्यांना ट्रफिकचे नियम समजावून सांगत होते".  


एका महिन्यात 11 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज 
स्क्विड गेम या वेबसीरिजने प्रदर्शित होताच चार आठवड्याच्या आत 11 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज  मिळवले आहेत. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे. नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ब्रिडर्टनला देखील स्क्विड गेम या वेब सीरिजने मागे टाकले आहे. 28 दिवसांत ब्रिजर्टनला 82 मिलियन व्ह्यूज  मिळाले होते. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर पोस्ट शेअर करत सांगितले,'स्क्विड गेम' वेबसीरिज आतापर्यंत 11 कोटी 10 लाख लोकांनी पाहिले आहे. 


'स्क्विड गेम' वेबसीरिजला 30 पेक्षा जास्त भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळेच लोकांना या वेबसीरिज पर्यंत सहज पोहचता येत आहे. 'स्क्विड गेम' 9 भागांत प्रदर्शित करण्यात आली आहे. पहिल्या सीझनचा रनटाइम 8 तास 12 मिनिटे आहे. ही वेबसीरिज कोरियन खेळामुळे कर्जात बुडालेल्या 456 लोकांवर भाष्य करते. लोकांना पैशाचे आमिश दाखवत खेळात सहभागी करुन घेतले जाते. त्यानंतर त्या सर्व लोकांना मारण्यात येते. हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलिअन डॉलर मिळतात.