Netflix Upcoming Shows : कोरोनामध्ये अनेक निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाही निर्माते त्यांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत. अशातच नेटफ्लिक्सने आज नऊ सिनेमांची घोषणा केली आहे. सिनेप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आता सिनेप्रेमींचा प्रत्येक दिवस फिल्मी होणार आहे. 


द आर्चीज


'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे. तर रीमा कागती या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमात सुहाना खान, अगस्त नंदा, खुशी कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. स्टारकिड्स या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 


मोनिका ओ माय डार्लिंग


'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमातील राजकुमार राव, राधिका आपटे. हुमा कुरैशी आणि सिकंदर खेरचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


प्लॅन ए प्लॅन बी 


'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तमन्ना भाटिया आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. पुढील महिन्यात हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 






चोर निकल के भागा


'चोर निकल के भागा' या सिनेमाची घोषणा आज नेटफ्लिक्सने केली आहे. या सिनेमात यामी गौतम, सनी कौशल आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. 


खुफिया


'खुफिया' या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. विशाल भारद्वाजने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तब्बू या सिनेमात केंद्रस्थानी आहे.


कटहल


'कटहल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा यशवर्धन मिश्राने सांभाळली आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा, विजय राज, राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


चकदा एक्सप्रेस


'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे.


कला


'कला' या सिनेमाची घोषणा करण्यासोबत नेटफ्लिक्सने या सिनेमातील एक गाणंदेखील प्रदर्शित केलं आहे. अन्विता दत्तने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस; प्रकृतीत सुधारणा


Celebrity Diary : वरण-भात, तूप अन् लोणंचं; 'असा' आहे रांगड्या राणादाचा रोजचा खुराक