Vidya Balan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचा  (Vidya Balan)  आज 44 वा वाढदिवस आहे. विद्यानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या साडी लूकला अनेकांची पसंती मिळते. साडी आणि विद्याचं खास नातं आहे. कोणत्याही पार्टीला किंवा पुरस्कार सोहळ्याला विद्या ही तिच्या साडी लूकमध्ये हजेरी लावते. विद्या तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जाणून घेऊयात विद्याचे चित्रपट आणि तिच्या संपत्तीबाबत....


विद्याचे चित्रपट
विद्याचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी झाला. विद्यानं मुंबईमध्ये एन्थोनी गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या परिणीता या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात विद्यानं ललिताची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने द डर्टी पिक्चरमध्ये सिल्कची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचं सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केलं.  शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे कथानक मानव आणि प्राणी यांच्यावर अधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता.  लगे रहो मुन्नाभाई, तुम्हारी सुल्लू  आणि बेगम जान या चित्रपटामधील विद्याच्या अभिनयाचं देखील अनेकांनी केलं. 


विद्याची संपत्ती
विद्या जवळपास 134 कोटी संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे 14 कोटींचे अपार्टमेंट देखील आहे. विद्याकडे मर्सिडीज-बेंजसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत. 






विद्या सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच वेगवेगळ्या गाण्यांचे, डायलॉग्सचे मजेशीर व्हिडीओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Vidya Balan : 'त्यानं मला कुरूप असल्याची जाणीव करून दिली अन् मी.....'; विद्यानं सांगितला अनुभव